आजच्या आज हजर व्हा; क्राइम ब्रांचने बजावले सौरव दास-आशुतोष रांका यांना समन्स, तपासाला वेग

Foto
नवी दिल्ली : जंतरमंतर येथील आंदोलनस्थळाची अधिसूचना रद्द असलेल्या कालावधीत शांततेचा भंग करणार नाही किंवा तेथे आंदोलन करण्याचे आवाहन करणार नाही, असे लेखी हमीपत्र दिल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांची सौरव दास आणि आशुतोष रांका यांची विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयाने सुटका करण्याचे आदेश दिले. या घडामोडींना काही तास उलटताच क्राइम ब्रांचने समन्स बजावले आहे.
 
क्राइम ब्रांचचे सौरव दास अन् आशुतोष रांका यांना समन्स
सीजेपी नेते सौरव दास, आशुतोष रांका यांच्या अडचणी वाढत असल्याचे दिसत आहे. दिल्लीपोलिसांच्या गुन्हे शाखेने त्या दोघांना समन्स बजावले आहे. पोलिसांनी त्यांना त्यांचे जबाब नोंदवण्यासाठी गुन्हे शाखेसमोर हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. आज दुपारी १२ वाजता राजौरी गार्डन येथील गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर व्हायचे आहे. या ठिकाणी संबंधित प्रकरणाच्या विविध पैलूंवर चौकशी केली जाणार आहे. त्यांचे जबाब नोंदवले जातील. या कायदेशीर कारवाईमुळे त्यांच्या अडचणींमध्ये भर पडत असल्याचे म्हटले जात आहे. 

दरम्यान, चौकशी पूर्ण होईपर्यंत दोघांनाही प्रत्येकी ५० हजार रुपयांचे वैयक्तिक बंधपत्र आणि जामीनदाराचे बंधपत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. दोघांनीही बंधपत्रे सादर केल्यानंतर विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून काम पाहणार्‍या सहायक पोलिस आयुक्त रितू राज यांनी त्यांची तिहार तुरुंगातून सुटका करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्याची मागणी केल्यानंतर हा आदेश देण्यात आला. दोघांचे पूर्वीचे वर्तन प्रसारमाध्यमांमधील वक्तव्ये पाहता शांततेचा भंग होण्याची व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती असल्याचे पोलिसांनी म्हटले होते.

सौरव-आशुतोष माझ्यापेक्षा खूप मोठे नेते :  अभिजीत दीपके


नवी दिल्ली   : कॉक्रोच जनता पार्टीचे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना जामीन मंजूर करण्यात आला असला तरी दिल्लीपोलिसांच्या गुन्हे शाखेने समन्स बजावत हजर राहण्यास सांगितले आहे. यामुळे जामीन मिळाल्यानंतरही सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या अडचणी थांबताना दिसत नाहीत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सीजेपी संस्थापक अभिजीत दीपके यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.
 
अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून मत व्यक्त केले आहे. सौरव आणि आशुतोष हे केवळ माझ्यापेक्षा चांगले नेते नाहीत, तर माझ्यापेक्षाही मोठे नेते आहेत. माझ्या नेत्यांनो, तुमचे आदेश पाळायला मला आनंदच होईल. तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहे! पण यानंतर, माझ्याशिवाय कोणीही एकटे गार्डनमध्ये फिरणार नाही!!!, असे अभिजीत दीपके यांनी म्हटले आहे. 

मी तर फक्त ऑर्डर फॉलो करतो...!
जर कुणी खरोखरच या आंदोलनाचे नेतृत्व केले असेल, तर ते आशुतोष रांका आणि सौरभ दास यांनी. त्यांनी मोठी भूमिका बजावली. मी फक्त त्यांच्या आदेशांचे पालन करत होतो. माझे काम केवळ आशुतोष आणि सौरव यांच्या आदेशांचे पालन करणे हे होते. मी नेता आहे असे वाटत असेल, पण मी नव्हतो. सौरभ आणि आशुतोषच मला सांगायचे, आज तुला येथे जायलाच हवे, तुला हे करायलाच हवे आणि मी हो म्हणायचो. त्यांची निर्णय क्षमता माझ्यापेक्षा चांगली असल्याचे मला माहीत आहे, असे अभिजीत दीपने याआधी म्हटले होते. 

दरम्यान, सीजेपी नेते सौरव दास, आशुतोष रांका यांच्या अडचणी वाढत असल्याचे दिसत आहे. दिल्लीपोलिसांच्या गुन्हे शाखेने त्या दोघांना समन्स बजावले आहे. पोलिसांनी त्यांना त्यांचे जबाब नोंदवण्यासाठी गुन्हे शाखेसमोर हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. या दोघांना राजौरी गार्डन येथील गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर व्हायचे आहे. या ठिकाणी संबंधित प्रकरणाच्या विविध पैलूंवर चौकशी केली जाणार आहे. त्यांचे जबाब नोंदवले जातील. या कायदेशीर कारवाईमुळे त्यांच्या अडचणींमध्ये भर पडत असल्याचे म्हटले जात आहे.